कालचा दिवस भाग्याचा!
नविन घराचा ताबा मिळाला. पुण्यात घर व्हावे ही एका तपापासूनची इच्छा…ते स्वप्न आज सत्यात उतरले.
भाऊ, बहिण, आई यांनी घराचा ताबा घेतला. गुरुजींना बोलावून गणेशपुजन केले. संध्याकाळी माझ्या जवळच्या मैत्रिणी आल्या होत्या. मी विडियो-चॅटवर घर पाहिले, सगळे बघत होते, सर्वांशी बोलले. खूप आनंद झाला. माझ्या आईने व बहिणीने घरीच पाव-भाजी केली.
माझ्या आईच्या चेहर्यावरचा आनंद बघून मला समाधान वाटले. राहून-राहून माझ्या पपांची उणीव जाणवत होती. त्यांच्या चिऊचे घरटे बघायला ते आज हवे होते.
मी तिकडे नसतानाही माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी आपल्या घरच्यांसहित आवर्जून आल्या. मनं भरुन आले होते.
देवाचे शतश: आभार- हा दिवस दाखविल्याबद्दल, घर झाल्याबद्दल आणि माझ्यावर इतके प्रेम करणारी माणसे मला दिल्याबद्दल!
Miss u all…
Love u more!




अभिनंदन