अजी म्या 'चातका(ला)' पाहिले!!!

17 11 2009

‘चातक’ पक्ष्याबद्दल खूप काही एकले होते लहानपणापासून पण त्याचे दर्शन काही झाले नव्हते.  गेल्या रविवारी (‘Weekend’ ला मराठी शब्द सापडत नाहीए 😉 ) मुळशी-ताम्हिणी ला गेले होते. अचानक माझ्या मित्राने गाडी थांबवली आणि मला एक पक्षी दाखवला. तो होता Pied-crested Cuckoo’. एका झाडाच्या बुंध्याशी मस्तपणे किड्यांची न्याहरी (breakfast) करत होता. Record shot म्हणून थोडे फोटो काढले पण ते काही खास आले नाहीत कारण साहेबांची सारखी चुळबुळ सुरु होती. हा पक्षी South Africa मधून दर वर्षी भारतात येतो ही अधिक माहिती मित्राने पुरवली.

नविन पक्षी पाहिल्याने खूप आनंद झाला होता. घरी येऊन शोधल्यावर कळले की हा म्हणजेच आपल्या मराठीतला ‘चातक’ (हिन्दी – ‘पपिया’). असंख्य कवितांमध्ये उल्लेखला जाणारा आपला चातक हा परदेशी पाहुणा असल्याचे कळल्यावर मनं थोडे खट्टू झाले. त्याचे दर्शन का दुर्मिळ आहे याचेही कारण समजले. मोन्सून सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वी चातक भारतात हजेरी लावतो. आत्ता तो फक्त पावसाचे थेंबच पिऊन आपली तहान भागवतो यात किती तथ्य आहे आणि किती कल्पकता हा शोधाचा विषय आहे.

अजी म्या ‘ब्रह्म’ पाहिले प्रमाणेच, ‘चातकाला’ बघून ‘ब्रह्म’ पहिल्या इतकाच आनंद मला झाला हे खरं! 😀

Advertisements

अंमलबजावणी

Information

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: