मानस आणि ‘दत्तक पुत्र’

18 11 2009

(दचकण्याचे काही कारण नाही. मानस आणि ‘दत्तक पुत्र’ या लेखाच्या  नावावरुन तुम्ही मला लगेच सुश्मिता सेन च्या रांगेत नेऊन बसवू नका. मी कुणालाही दत्तक-बित्तक घेत नाहिए.) 🙂

आमच्या कंपनीने नविन ऑफिस ‘खराडी’ ला घेतल्या पासून कोण-कोण शिफ्ट होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. आमच्या सुदैवाने आमचा शिफ्ट होणारा प्रोजेक्ट ऐन वेळेस cancel झाला. आमच्या क्युबिकल मधल्या दोघांचा (‘मानस’ आणि ‘कुणाल’ चा) प्रोजेक्ट शिफ्ट होणार होता. एक-दोन आठवडे पोस्टपोन होता-होता शेवटी एकदाची final तारिख जवळ आली. १६ पासून माझे क्युबिकल रिकामी होणार होते. शुक्रवारी सगळ्यांनाच मनातून वाईट वाटत होते. नाही म्हंटले तरी एक वर्ष आम्ही एकत्र बसत होतो. छोट्या-छोट्य गोष्टी  share करत होतो. खरंतर मला हे दोघेही बरेच जुनियर पण मैत्रीला वयाचे बंधन नसते हेच खरे!

मानस आणि कुणाल यांची जोड-गोळी म्हणजे शब्दश:  ‘Laurel and Hardy’ चीच जोडी.

त्यातला ‘मानस’ हा माझा सख्खा शेजारी. आमचे फोन एक्स्टेंशन पण एकच. ‘कोंकोना सेन’ वर फुल्ल लट्टु, तिचा उल्लेख आम्ही ‘हमारी भाभी’ असाच करतो. लिहायची आवड असणारा, वपुंचा चाहता, एकदम jolly.  नावाने गुजराती असला तरी मनाने पूर्णपणे मराठी. ह्याच्या स्क्रिनवर जी-टॉक च्या असंख्य छोट्या-छोट्या खिडक्या विखुरलेल्या असतात.

दुसरा ‘कुणाल’ – हा साधारणत:  ११:३०-१२ च्या आस-पास ओफिस मध्ये उगवतो. एकदा मी त्याला सहज विचारले “असा उशिरा ओफिसला येयला तू काय आमच्या (कंपनीच्या) CEO चा दत्तक पुत्र आहेस का???“. आणि तेव्हा पासून मी त्याचे नाव DP (दत्तक पुत्र) असेच ठेवले. ह्यावरुन यथेच्च चिडविणे ही होत होते. वेग-वेगळ्या आणि महागड्या हॉटेल्स मध्ये ह्याला जायला आवडते (कदाचित नागपूर मध्ये स्वत:चे हॉटेल असल्यामुळे त्याला ही  आवड जडली असेल), त्याबद्दल त्याला खूप माहिती सुध्दा आहे. ह्या बरोबरच तो  English music, Hollywood movies, Western musicians, rock-pop stars बद्दल जाणकार मंडळींपैकी आहे. हल्ली त्याला फोटोग्राफीचा किडा चावला आहे (याचे थोडेसे श्रेय मी मला घेतेय हा DP!) .

ऑफिसमध्ये सकाळी आल्यावर “गुड मोर्निंग” पासून सुरुवात, अगदी टिवल्या-बावल्या करेपर्यंत आमची मजल, कधी कधी healthy conflicts, ऐकमेकांना “अरे कधीतरी कामं पण करा लेको…” असे सांगून चिडवणे, जी-टॉक ची गमतीदार चॅट transcripts पाठवणे, पिक्चर ची ओनलाइन तिकिटे बूक करणे, पझ्झल्स सॉल्व करणे, US हून आलेल्या colleagues ने आणलेली ‘chocs’ वाटून खाणे. (हो! IT मध्ये चोकोलेट्स ची ‘chocs’ होतात.) सगळ्यात आधी त्या chocs मध्ये अंड आहे का ते बघणे (आमचा क्युबिकल प्युअर वेज आहे ना!!) आणि मगच वाटून ती खाणे, रात्री उशिरा टाकलेले माझे फ्लिकर वरचे स्नॅप्स आल्या आल्या त्यांना दाखवणे आणि त्यांच्या प्रतिक्रिया मागणे, कविता, जोक्स शेर करणे, नविन घर घेण्यासाठी बिल्डर च्या साइट्स डिसकस करण्यापासून ते अगदी होम लोनसाठी बॅंक एक्झिक्युटीव चे फोन नंबर देण्यापर्यंत, पुण्यातल्या हॉटेल्स व साइट-सीइंग प्लेसेसवर चर्चा, या सगळ्यातून आमची मैत्री घट्ट होत गेली आहे.

आत्ता माझ्या शेजारच्या २ रिकाम्या खुर्च्या बघून कसंस होतेय पण ज्या प्रमाणे मैत्रीला वयाचे बंधन नसते तसेच अंतराचे ही नसते. आमच्या कंपनीच्या Office Communicator वरुन आम्ही आमची मैत्री टिकवू याचा मला पूर्ण विश्वास आहे… हो की नाही मानस, DP???

(वरचे सगळे टाइमपासचे खरे असले तरी आम्ही ओफिस मध्ये कामेही नीट आणि वेळेवर करत असतो. शंका असणार्‍यंना खोलवर तपशील पुरवले जातील) 😀

Advertisements

अंमलबजावणी

Information

4 responses

6 02 2010
akhiljoshi

झकास..

16 01 2010
Pankaj - भटकंती Unlimited

अरेच्चा… तर तू इकडे पण आहेस तर… मला माहीतच नव्हते.

29 11 2009
विक्रम

अप्रतिम लिहिले आहे..
– विक्रम कुलकर्णी

23 11 2009
Pallavi

Amazing…
Last lines of you blog speak everything… Good friends and friendship never care about barriers.. I wish you cherish & enjoy togetherness always !!!!!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: