भिगवण – एक (छे!… अनेक) अविस्मरणीय अनुभव

4 02 2010

भिगवणच्या रोहित पक्ष्यांशी ओळख आत्ताश: बरीच जुनी झालीए. गेले काही वर्ष आणि दर वर्षातून किमान दोन वेळा तरी डिक्सळ मला साद घालते आणि मग एखाद्या शनिवार-रविवारी झपाटल्या सारखी मला पहाटे ३:३० ला जाग येते. माझ्यातली ‘झोपाळू मी’, ‘पक्षीवेड्या मी’ ला विचारते “जाणार आहेस का भिगवणला की झोपतेस परत?”. दोन मनांचा गोंधळ उडतो… आणि दर वेळेस न चुकता पक्षीवेडी मीच जिंकते. खरंतर काही कुणाचा force नसतो पण डिक्सळ ह्या जागेची आकर्षणशक्तिच इतकी अफाट आहे जी मला तिकडे ओढून नेते. मला तिकडे नेण्यात मोलाचा वाटा माझ्याच सारख्या (किंवा माझ्याहून कैक पट अधिक म्हणता येइल अशा) माझ्या wildlife वेड्या मित्राचा आहे. 🙂

या हंगामातली दुसरी खेप मागच्या शनिवारी झाली. नेहमी प्रमाणे मित्राने sms टाकला “उद्या भिगवण. तुझा काय प्लॅन?”. मला ‘सिंहगड वॅल्ली’ ला जाऊन ‘शाही बुलबुल’ a.k.a ‘स्वर्गीय नर्तक’ (English – Paradise Flycatcher) बघायचा होता. म्हणून डोक्यात तो प्लॅन घोळत होता. ह्या स्वर्गीय नर्तकाने मला आत्ता पर्यंत एकदाच ‘खंबाटकी’ घाटात दर्शन दिले होते आणि ते ही मी स्वत: गाडीने घाट चढत असताना. माझ्या गाडीत पक्षांबाबत संपूर्ण उदासिन मंडळीही होती. “तू पक्षी नको बघू…गाडी चालवण्याकडे लक्ष दे.” असा शेरा मारण्यात आला. त्यामुळे थांबता येणे अशक्य होते. तेव्हापासून याला मनं भरुन बघायची इच्छा मनी बाळगून आहे.

हा तर आपण कुठे होतो – ‘सिंहगड वॅल्ली’ ला एकट्याने जायचे मनात होते म्हणजे तिकडे माझ्यासारखे अजून अनेक वेडे लोक असणारच होते. परवा २६ जानेवारी चा जोक आठवला. कोणीतरी सांगत होते “२६ च्या सुट्टीला वॅल्ली मध्ये पक्ष्यांपेक्षा लोकंच जास्त होते” 😀

गर्दी बघून कोणता पक्षी लोकांना कंटाळून आपले दर्शन cancel करेल याचा काही नेम नाही. 😦 विचारांती स्वर्गीय नर्कताची भेट लांबणीवर टाकून मी भिगवणचा  प्लॅन fix केला. बघा परत, नेहमी प्रमाणे ‘रोहित’ पक्ष्यांनीच बाजी मारली.

४:३० ला निघून आम्ही सोलापूरचा रस्ता धरला. वाहतूक कोंडी न झाल्यामुळे बरोबर ६:३० ला भिगवणला पोहचलो. गाडी ‘हॉटेल सागर’ जवळ थांबली आणि आम्ही आत शिरलो. हॉटेल मालकाने ओळखीचा smile दिला. नेहमीच्या सलगीने वेटरला ऑर्डर दिली – “१ इडली-सांबार,  १ इडली-चटणी आणि २ चहा”. या ऑर्डर मध्ये पण गंमत आहे – इडली-सांबार व इडली-चटणी ही एकच डिश आहे पण माझ्या मित्राची ती style वेटरला ही ठाऊक आहे. फ़्रेश होऊन मस्त नाष्टा चेपला. डिक्सळची वाट खूणावत होती आणि वेळ न दवडता गाडी त्या दिशेने हाकली.

Ducks, teals, white-breasted waterhen, Brahminy Ducks, Bar-headed geese, Asian open bills, purple moorhen, Northern Shoveler, white egret, glossy ibis, white ibis, sandpiper, Marsh Harrier, black-winged stilt, Tree pipit, Yellow Wagtail, Wagtail, Sea gull, river terns, bee eater, black drongo आणि  Spotted eagle ही एवढी मंडळी वाटेत थोड्या थोड्या अंतरावर आमच्या स्वागताला हजर होती.

डिक्सळ पुलावर आलो आणि आम्हाला बघून गंगाराम धावतच आला. डिक्सळ पुल संपला की मासेमार्‍यांची (किंवा नाविकांची) ७-८ घरं आहेत. त्यातलाच एक आहे गंगाराम. जो आमचा ‘पेटंट’ नावाडी आहे. दर वर्षी आणि वर्षातल्या प्रत्येक वेळी यानेच आम्हाला पाण्यात पक्षी दाखवायला नेले पाहिजे असा नियमच आहे. वास्तविक गंगारामचे (सख्खे, चुलत, मावस, मामे) भाऊ आणि त्यांच्या बायका सगळेच नाव चालवतात व येणार्‍या पाहुण्यांना पाण्यात घेऊन जातात पण तरीही आम्हाला गंगारामच लागतो.

अतिशय superfast बोलणारा (तेही बोली भाषेत), आम्हाला सांगू तितके आत नेऊन, सांगू तितका वेळ पाण्यात थांबवणारा, मासेमारी करुन (आणि तीच खाऊन/विकून) उदरनिर्वाह करणारा गंगाराम हा एक मेहनती इसम आहे.  तो आमचा आणि आम्ही त्याचे (?) लाडके आहोत. त्याच्यालेखी ‘पक्षी’ म्हणवून घेण्याचा बहुमान फक्त ‘फ़्लेमिंगों’चा आहे. इतर पक्षांची तो मराठी नावे घेतो. ती बरीचशी नावे माझ्या मित्रानेच त्याला सांगितली आहेत. उदा. – “यंदा ‘चमचे’ लई आले नाइत.” म्हणजे ‘स्पून बिल्स’ (spoon bills) बद्दल त्याला सांगायचे असते. आम्हाला इष्ट-स्थळी नेऊन होडी कोणत्यातरी वेली-झुडपाच्या फांदीला अडकवून हा खुशाल झोप काढतो. ती झोप थोड्या वेळाची असली तरी तो चक्क घोरायला वगैरे लागतो. Quality vs Quantity principle कित्ती सहजपणे तो apply करतो. 😀

दर खेपेला त्याचा मला एकच प्रश्न असतो “तुम्ही मासे खाता का?” आणि मी “नाही.” असे म्हटल्यावर त्याचा चेहरा थोडा खट्टू होतो आणि तितकाच माझ्या मित्राचे “पण मी खातो” हे एकून एकदम फुलतो. पाण्यात जाई पर्यंत माझ्या त्याच्याशी गप्पा सूरु असतात – “हे पाणी कित्ती खोल आहे?”, “तुम्हाला पोहता येते ना?” “तुमचा मुलगा कितवित आहे?”, “ही होडी किती जुनी आहे?” इत्यादी इत्यादी. मग आम्ही चोकलेट्स वगैरे शेर करतो.

ओ.के – तर गंगाराम आला आणि आम्ही होडीत बसलो. नेहमी पुलाच्या उजव्या बाजुला असलेले रोहित पक्षी आता डाव्या बाजुला आणि ते ही बरेच आत गेले होते. गप्पा मारत मारत पाण्यातून निघालो. सुर्याच्या तेजाने  पाणी सोनसळी केले होते. बर्‍यापैकी आत गेल्यावर आम्हाला रोहित पक्षांचे आवाज ऐकू यायला लागले. ४०-५० पक्षी दृष्टिक्षेपात पडले. आम्ही शांत झालो व होडी थांबवून टाकली. “तू मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देखू के प्यार (इथे – फोटोग्राफी) करु?” अशी situation होते या फ़्लेमिंगोंना बघून. 😛

फ़्लेमिंगोंमध्ये एक रुबाबदारपणा असतो. त्यात त्यांचा गुलबट रंग आणखी भर घालतो. उडताना तर ते अप्रतिम दिसतातच पण पाण्यात चालत फिरतानही त्यांच्यात एक डौल असतो. हे सगळे बघायला खूप खूप मजा येते. मी समोरचे सगळे आधी डोळ्यात आणि मग कॅमेर्‍यात साठवत होते. थव्यात २-३ पिल्ले ही होती. त्यातले एक छोटुसे पिल्लू आईच्या (की बाबांच्या?) सारखे मागे मागे करत होते.

थोडा फार वेळ गेला असेल तेवढ्यात गंगाराम म्हणाला “तो बघा पक्ष्यांचा थवा येतोय”(remember पक्षी ‘ = ‘रोहित’). पाहतो तर काय ३०-४० रोहित पक्षी आमच्या दिशेने उडत येताना दिसले. मनात आले “वाह! आत्ता यांचे मस्त landing बघायला मिळणार”. पण हे फ़्लेमिंगो आणि देव दोघेही जरा जास्तच मेहेरबान झाले आमच्यावर. ह्या थव्याने हवेत उडत आमच्या भोवती ६-७ घिरट्या मारल्या. मला काय करु आणि काय नको असे झाले होते…पहिल्या २-3 फेर्‍या तर मी कॅमेरा बाजुला ठेऊन फक्त ‘अनुभवल्या’. ‘बघितल्या’ हे म्हणने थोडे कमी दर्जाचे वाटतेय. नंतर कॅमेरा घेऊन जे काही काढणे शक्य वाटले ते काढत गेले. मनसोक्त फेर्‍या मारुन ते आमच्या समोर अलगद पाण्यात उतरते झाले. त्यांच्या त्या आकाशातील घिरट्या आणि landing हे सगळे अतिशय रोमांचक होते. अविस्मरणीय आणि अवर्णनीय!!!

डिक्सळ (भिगवण) ला निसर्गाचे खूप मोठे वरदान आहे, याचा मला दर खेपेला प्रत्यय येतो. भिगवणने मला भरभरुन आनंद दिलाय आणि म्हणूनच मी तिकडे खेचली जाते. हल्ली एक गोष्ट जिव्हारी लागतेय – आमच्या मागून एक होडी तिथे पक्षी बघायला (की बडबड करायला?) आली होती. ४-५ बायका, २ पुरुष आणि २-३ पिल्लावळ असा चमू होता. त्यांचा नावाडी तर जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्यात त्या लोकांची (मोठ्याने) कुज-बुज अखंड सुरु होती. शिवाय काही फोटोग्राफी करणारे शहाणे चिखलातून जाऊन, पाण्याच्या किनारी पक्ष्यांपर्यंत पोचू पाहत होते आणि कडेला उभे राहून पक्ष्यांना उडवून लावत होते… का तर त्यांना पक्ष्यांचे उडतानाचे फोटो घेता यावेत म्हणून. 😦

हा लेख वाचणार्‍या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की डिक्सळ (भिगवण) सारखी ठिकाणे मुला-बाळांना घेऊन जाऊन गोंधळ करायची नाहित. आपल्या गप्पा-गोष्टी ऐकायला आणि त्रास सहन करायला हे पक्षी स्थलांतर करत नाहीत. आपण जाऊन त्यांना त्रास होईल असे वागायचा हक्क आपल्याला मुळीच नाहीए. हे मान्य आहे की आपल्यामुळे नावाडी लोकांना थोडा धंदा मिळतो पण तिथेही त्यांच्या वल्हवण्याच्या श्रमांकडे काणा-डोळा करुन पैशांची घासा-घीस घालणारे लोक मी बघितलेत. पक्ष्यांना त्रास देऊन, फोटो काढता यावेत म्हणून उडवून लावणार्‍यांची तर मला कीव येते.

कृपया वन्यजीवन दुरुन बघून, त्यांना त्रास न देता निसर्गाचा आस्वाद घेता यायला हवा. हे दिसणारे पक्षी कैक मैल उडून इथल्या निसर्गासाठी आपल्यासमोर येतात हे ध्यानी ठेवले पाहिजे. त्यांचा मान ठेऊन मस्त आनंद लुटायला हवा कारण “फिर ये समा… कल हो न हो!

अजून फोटो बघायला इथे टिचकी मारा – http://www.flickr.com/photos/ruhiclicks/sets/72157609126814258/detail/

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Advertisements

अंमलबजावणी

Information

4 responses

16 08 2011
amol kumbhar

dear ruhi mam,
Diksal is my native place.
i thnk wt u wright @ bird watching experience at diksal is very useful to any one who wanted to visit diksal for this purpose.congratulations to u for this greate work and please visit this place again.
( Amol Kumbhar-9822938966)

29 05 2011
Amol Kumbhar

Dear Ruhi Madam,

tumach amchyaa diksal gawatil ya pakshi-prema baddal Abhinandan.

me ya gawatilach ek yuwak ahe. tumhi tumache Rohit pakshanbaddlche

lihlele mat atishay surekh watle. keep it up. lage raho…..(amol kumbhar)

5 02 2010
Pankaj - भटकंती Unlimited

मी परत एकदा व्हर्च्युअली जाऊन आलो बघ. मराठी ब्लॉगस्फियरमध्ये स्वागत.

5 02 2010
prasad rasal

ek number ruhi…khup mhanje khup chan lihile ahes…itkya vela diksal baghitle…tari tuzhya blog varun ek navin anubhuti ali….jai flemingo…oops jai pakshi…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: