दिसला गं बाई दिसला…!

6 02 2010

काल रात्री उशिरा ‘सिंहगड वॅल्ली’ ला जाण्याचा प्लॅन ठरला. सकाळी ६:३० ला आम्ही सिंहगडची वाट धरली आणि वॅल्लीत जाऊन पोहचालो. गेल्या-गेल्या ‘Changeable Hawk Eagle’ नजरेस पडला.

‘पॅराडाइज’ (‘शाही बुलबुल’ किंवा ‘स्वर्गीय नर्तक’) जिथे दिसतो त्या पॅचमध्ये आम्ही आमचा डेरा जमवला आणि त्याची ‘आराधना’ करत बसलो. बराच वेळानंतर ‘पॅराडाइज फ्लाय-क्यॅचर’ मॅडम आल्या. ‘पॅराडाइज’ ला बघून एकदम आनंद झाला. इकडून-तिकडे करत करत बाईसाहेब मस्त उंदडत होत्या.

त्यांच्या मागो-माग त्यांच्या युवराजांनी हजेरी लावली. ‘जुवेनाइल’ किंवा ‘सब-अडल्ट’ नर होता तो. दिसायला सुरेख. त्याच्या त्या शेपटीमुळे तो अजूनच रुबाबदार भासतो. पाण्याजवळ न्याहरीच्या शोधात आमच्या समोर आला. तो (छोट्या-छोट्या माश्यांच्या) न्याहरीत गुंतला आणि आम्ही त्याच्यात गुंतलो. तो त्यांचा आनंद घेत होता आणि आम्ही त्याचा. त्याची जमतील तशी छायाचित्र मी काढत होते.

हे पिल्लू निघून गेल्यावर दोन-अडीज तासांच्या आमच्या तपश्चर्येला न्याय देण्यासाठी ‘दस्तूर खुद्द’ पॅराडाइज नराने आम्हाला ‘courtesy visit’ दिली. पांढरा शुभ्र शाही पेहराव करुन एखाद्या राजाने समोर यावे असा तो आमच्यापुढे आला. त्याचे ते रुपडे जादुई होते…मंत्रामुग्ध करुन टाकणारे! 🙂

नेहमीप्रमाणे आमच्या मागे बसलेल्या ४ टकल्यांना (की कारट्यांना) नेमकी तेव्हाच उठून उभे रहायची दुर्बुध्दी झाली आणि तो पक्षी घाबरुन निघून गेला तो गेलाच. पुन्हा तो फिरकलाच नाही.त्यामुळे त्याचा मला एकही फोटो मिळाला नाही. 😦

इतरही काही पक्षी दिसले – Fantailed Flycatcher, Yellow Wagtail, Malabar Whistling Thrush, Red-throated Flycatcher, Tickells Blue Flycatcher.

शेवटी आम्ही गाशा गुंडाळला आणि वॅल्लीतून निघालो. इतक्या दिवसांची (की महिन्यांची/वर्षांची) ‘पॅराडाइज’ ला बघायची इच्छा आज पूर्ण झाली. ते म्हणतात ना – “इतनी शिद्दत से मैंने तुझे पाने कि कोशिश कि है; के हर झर्रे ने मुझे तुमसे मिलाने कि साजिश की हैं|”. 😀

वॅल्लीचा निरोप घेत, सिंहगड पायथ्याशी असलेल्या ‘हॉटेल शिवांजली’ मध्ये झणझणीत मिसळ-पाव दाबला आणि परतीच्या वाटेला लागलो.  🙂

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Advertisements

अंमलबजावणी

Information

One response

27 02 2010
हेमंत आठल्ये

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: