पापा केहते थे…!

20 03 2010

Finally, मी माझ्या पप्पांची एक इच्छा पूर्ण केली…Masters degree संपादन करण्याची… इतक्या वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. 🙂

१५ मार्च ला IGNOU ची 21st Convocation ceremony होती  (पदवी वितरण किंवा हिंदी – दिक्षांत  कार्यक्रम). इग्नू चे हे Silver Jubilee Year असल्यामुळे जरा जास्त बोल-बाला होता.

माझे नाव Register list मध्ये आहे का ते confirm करुन मी auditorium मध्ये आत येऊन खुर्चीवर बसले आणि गेल्या अनेक वर्षांची चित्रं डोळ्यांसमोर तरळून मला अलगद भूतकाळात घेऊन गेली. १ सप्टेंबर १९९९ मध्ये मी पुण्यात आले ती हातात फक्त Diploma घेऊन.  पुढे काहीतरी Computers चे शिकायचे, ते ही  नोकरी करत-करत हे मनात  पक्के होते. आम्ही सगळ्यात आधी इग्नू च्या BCA ची चौकशी केली. Admission procedure ला बराच अवकाश होता तरीही आम्ही BCA 1st sem चा DD भरुन टाकला.

डिप्लोमा च्या through-out distinction ची नशा होती पण त्या बरोबरच माहित होते की नुसत्या त्या syllabus वर नोकरी मिळणे काही तितके सोपं  नाही. Java, E-commerce, Web Programming, Javascript, ASP, NT Server सारख्या शब्दांनी सगळे व्यापून टाकले होते. पप्पांबरोबर अनेक institutes मध्ये जाऊन चौकशी केली आणि शेवटी एका कोर्सला admission घेण्याचे ठरवत होतो… पण माझा पाय मागे येत होता तो त्याच्या फी मुळे. ६०,०००/- फी होती, ती ही फक्त ८ महिन्यांसाठी…जवळ-जवळ २ वर्षांच्या BE च्या एवढी फी होती ती. घरच्या परिस्थिती ची कल्पना मला होती आणि म्हणून मी कच खात होते. आपटे रोडवरच्या Asset International च्या building खाली येऊन पप्पांनी मला थेट प्रश्न केला “तुला syllabus झेपेल ना?” माझा होकार एकून ते पुढे म्हणाले “फी चे काय आणि कसे करायचे ते मी बघेन..त्याची तू चिंता करु नकोस”. Admission घ्यायला गेल्यावर Placement cell वाल्या बाईंनी नविन टोला दिला “तुझा फक्त डिप्लोमा आहे बाकीचे सगळे batchmates BE + MBA किंवा किमान BE आहेत म्हणून आम्ही placements ची काहीच guarantee देऊ शकत नाही. इतरांना १० interview calls आले तरी तुला कदाचित एक-दोन येतील किंवा एकही येणार नाही”. पुन्हा tension आले…काय करावे बरं? शेवटी मनं पक्क केलं की खूप मेहनत करायची आणि स्वत:ला prove करायचं. त्या वेळेस बेताची आर्थिक परिस्थिती असताना पप्पांनी टाकलेला विश्वास माझी शक्ति बनून अंगात भिनत होता. अशा प्रकारे एकदाची E-commerce course ला admission घेतली.

आयुष्यात पहिल्यांदा घर आणि मुळात मम्मी पासून लांब आले होते. जेवणाचे हाल होत होते. PG म्हणून राहिले त्या निमकर आजी जरा विचित्र होत्या. त्यांच्या वन-रुम-किचन मध्येही त्यांना PG मुलगी ठेवायची हौस. त्यांच्या दिवसभर टि.वी. बघण्याचा मला अभ्यास करताना त्रास होत होता. खूप कमी वेळेत खूप काही शिकायचे होते…syllabus vast होता…Modules demanding होती…Exam pattern tough होता. सकाळी ६:४५ ला बस पकडून डेक्कनला पोहचायचे. ‘तुलसी’ मध्ये कधी फक्त चहा घ्यायचा, (पैसे असतील तर…) चहा-पोहे किंवा चहा-खारीचा क्रिम रोल खायचा. ७:०० ला course सुरु होयचा..दुपरी २:०० च्या सुमारास परत येऊन मेसचा डब्बा आणून तो जेवायचा. ते बेचव जेवण जेवताना मम्मीच्या जेवणाची आठवण येऊन डोळे भरुन यायचे. एकटेपणाचा वीट यायचा… तोपर्यंत कोणी फार मित्र-मैत्रिणीही झाले नव्हते. आमच्या बॅच मध्ये मी, अभिजित आणि लेले सोडल्यास सगळेच अमराठी public होते.

एका महिन्यानंतर मी आणि प्रज्ञा एकत्र राहायला लागलो आणि त्याच्या पुढच्या महिन्यात आम्ही  ‘एमी जोशी’ यांच्याकडे शिफ्ट झालो. १३१८, शुक्रवार पेठ हा पत्ता नंतरची ३-३.५ वर्ष आमच्या नावाला चिकटला (की आम्ही त्या पत्त्याला चिकटलो(?) ) 🙂

बघता बघता महिने उलटत गेले, course संपायची वेळ आली..आता चांगला मित्र परिवार झाला होता…प्रत्येक exam मध्ये चांगले scoring येत होते… हुरुप वाढत होता…. आणि अप्रिल च्या सुरुवतीला एका नोकरीसाठी अर्ज केला, interview झाला आणि नोकरी मिळाली. आम्ही Dishnet च्या projects वर काम करणार होतो, पुलगेटच्या chya ETH office मध्ये आमची team बसायची. ४ अप्रिल २००० ला joining होते. मे महिन्यामध्ये course संपेपर्यंत ७:०० ते २:०० course आणि ३:००-७:०० part-time नोकरी. आमच्या बॅच मध्ये पहिली नोकरी मला मिळाली होती. घेतलेल्या श्रमांचं चीज होत होतं.

हातात नोकरी आल्यावर मनात आले आत्ता कशाला इग्नू चे graduation हवंय म्हणून इग्नू च्या Regional centre ला जाऊन भरलेला DD परत घेऊन आले. पप्पंना कळल्यावर त्यांनी समजावले (हो, ते कधीच ओरडत नसत…त्यांना ओरडताच आले नाही कधी आम्हा तिघांवर) की Graduation important आहे आणि नोकरी असलीतरी basic qualification फक्त ‘Diploma’ हे बरोबर नाही. मी गुप-चुप पुन्हा इग्नू मध्ये जाऊन DD देऊन आले. 😦

सोमवार-शनिवार  (हाफ डे) ऑफिस आणि शनिवार दुपार-रविवार वी. आय. टी. कॉलेज अशी दुहेरी कसरत सुरु झाली. त्यातच आमचे पुलगेटचे ऑफिस अभिमानश्री सोसायटी, पाषाणला शिफ्ट झाले आणि शुक्रवार पेठ ते अभिमानश्री असे दर दिवशी पुणे दर्शन करावे लागत होते, ते ही माझ्या सन्नीवर. शनिवार hectic होता. हाफ-डे ऑफिस आणि दुपारी अप्पर इंदिरा नगर ला कॉलेज. सगळे मॅनेज करत गेले कारण पर्याय नव्हता. ऑफिसमध्ये मीच सगळ्यात वयाने लहान होते. सगळे ५-६ वर्षांनी मोठे होते. colleagues प्रेमाने आणि co-operation ने वागत होते. रसिका आणि सुश्मिता ने कायम प्रोत्सहन दिले, घरातल्याच लहान व्यक्तिप्रमाणे आपुलकीने वागवले आणि आजही वागवत आहेत.

सगळे सुरळीत चालू असताना २००१ च्या शेवटी ले-ऑफ झाला आणि नोकरी गेली. ‘Devi & Associates’ dissolve झाले. एक वर्ष मी SSI मध्ये नोकरी केली. २००२ शेवटी एका NGO मध्ये त्यांच्या वेब प्रोजेक्टस् साठी वेब प्रोग्रामर म्हणून नोकरी मिळाली. मला जपान ला जाण्याचा chance मिळाला. तिथे १.५ वर्ष काम करुन मग Software Testing मध्ये शिफ्ट मारला. जोपासना, कॅनबे करत करत माझे करियर बनत गेले. अनेक अनुभव मिळाले…खूप मित्र-मैत्रिणी मिळाल्या….खूप प्रकारची लोकं भेटली. Maturity वाढत गेली. Independency आणि responsibility वाढत गेली. घेतलेले सगळेच निर्णय बरोबर ठरले असे नाही पण जे चुकले त्यातून दुप्पट शिकले.

प्रत्येक नोकरी stable years काम करुन योग्य कारणांसाठी, ‘गुड नोट’ वर सोडली. म्हणून पहिल्या जोब पासून ते आत्तापर्यंत काहींशी जोडलेली मैत्री अजूनही टिकून आहे. कमी वयात आणि कमी वेळेत खूप काही पहायला मिळाले. काही आयुष्यभराचे ऋणानुबंध जोडले गेले.

करियर सांभाळून शिक्षण सुरु होते… जून आणि डिसेंबर हे परीक्षेंचे महिने आणि नेमके त्याच वेळेस प्रोजेक्ट रिलिज यायचा आणि सहज पास होऊ अशा पेपरना पण बसता यायचे नाही. वेळ वाया जात होता…पण मनं माघार घायला तयार नव्हते… असे करत करत (रडत-खडत नाही हा!) BCA पूर्ण झाले, ते ही First class मिळवून!

BCA नंतर शिक्षण थांबवावे असे मनात आले पण पप्पांनी “MCA ही कर…ओघाने होऊन जाईल” असे सुचवले. MCA ला admission घेतली. submissions, vivas, practicals आणि exams हे सुरुच होते. syllabus तसा कठिण होता. कॉलेज मध्ये काही शिकवतील याची अपेक्षा करणे ही चुकीचे होते. त्यात अचानक पप्पा गेले आणि घरची जबाबदारी सांभाळण्यापेक्षा, ते गेल्याने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे जास्त कठिण होते.

MCA चे पपेर्स नीट सुटत गेले. वेळोवेळी मदतीचे अनेक हात मिळाले. BCA च्या गणितासाठी मी रसिकाच्या बाबांकडे शिकवणी लावली, TCS (Theory of Computer Science) सारखा समजायला कठिण पण एकदा कळला की scoring, अशा subject साठी प्रज्ञा होती, Financial Accounting साठी विक्रांत कडे गेले. Self study वर जास्त भर दिला. ‘Where there is a will, there is a way’ असे झाले आणि हा-हा म्हणता MCA ही पूर्ण झाले.

इग्नूची ती convocation ceremony सुरु असताना मी मात्र माझे स्वत:चेच विश्व पुन्हा जगून आले. पुण्यात आलेली तेव्हाची मी आणि आत्ताची मी यात बरीच प्रगती होती (असे मला तरी वाटतेय). हातातला फक्त डिप्लोमा असताना prove करायची महत्वाकांक्षा होती. स्वप्नांना सत्यात उतरवायची आणि त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी होती. Graduation आणि नंतर Post Graduation करताना, नोकरी आणि व्ययक्तिक जीवनामध्ये अनेक उतार-चढाव अनुभवले होते. घरच्यांबरोबरच, जवळचे आणि हक्काचे मित्र-मैत्रिण यांची मोलाची साथ होती म्हणून एक एक गोष्ट निभावत गेली.

माझ्या पप्पांची ही एक इच्छा मी यशस्वीरित्या पूर्ण केली याचे समाधान जास्त आहे. ते आज असते तर त्यांना किती आनंद झाला असता या विचाराने मनं भरुन आले होते… डोळ्यात पाणी आले होते. MCA च्या यादीत माझेच नाव पहिले होते. माझे नाव पुकारले गेले आणि मी stage वर गेले, degree certificate हातात घेऊन stage वर मागे जाऊन उभी राहिले…एक एक batchmates स्वत:चे certificate घेऊन मला join करत होते कारण शेवटी degree specific ग्रुप फोटो काढायचा होता. लोकांच्या टाळ्या सुरु होत्या…त्या लोकांमध्ये कुठेतरी मला माझ्या पप्पांचे अंधुकसे अस्तित्व भासत होते…त्यांच्या टाळ्या ऐकू येत होत्या… आणि मला नेहमी स्फुर्ती देणारा आणि सदैव हसतमुख असा त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर असल्याचा भास होत होता. हातात ते certificate घेऊन मनं त्यांना म्हणत होते “This is for u Papa…thanks for being there!”.

Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

4 responses

5 02 2011
Kalyani

touch my heart… very emotional and inspiring….

22 06 2010
Pankaj - भटकंती Unlimited

mast… keep it up.

28 05 2010
Sandeep

Truely inspiring!

20 03 2010
Shishir

TOUCHED!!!!

GOD BLESS!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s
%d bloggers like this: