हापूस

13 05 2011

माझा जन्म रत्नागिरीचा. त्यामुळे ‘हापूस’ या फळाशी माझे तेव्हापासूनचे नाते. त्याचे (जन्माचे नव्हे हो, हापूस चे) बरेच वर्ष मला काही कौतुक वाटायचे नाही. चुकीचा समज करुन घेऊ नका. कौतुक नाही  म्हणजे – लहानपणापासून ‘हापूस’ हा इतका बघायला (आणि खायला) मिळाला की त्याबद्दल अप्रुप वाटायचे नाही.

अप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून हळूहळू आंब्याचे बाजारात आगमन व्हायचे. सुरुवातीला भाव वधारलेले असत. पण तरीही वडिल आंबे हमखास घेऊन येत. त्यांना आंब्यांची चांगली जाण होती. शिवाय घरी दारावर काही ‘माम्या’ (मामीचे बहुवचन). हा खास कोकणी शब्द आहे. दारावर ताजी भाजी, ओले काजु, लोणचाच्या कैर्‍या, आंबे, फणसाची कौरी, इत्यादी विकायला घेऊन येणार्‍या बायकांना ‘मामी’ म्हणायची पद्ध्त आहे. जसे सगळे पोलिस ‘मामा’ असतात ना तशी.

कोकणेतर लोकांचा एक (गैर)समज असा की कोकणात प्रत्यकाच्या आंब्यांच्या बागा आहेत. तो समज स्वाभाविक आहे म्हणा, पण माझ्या सारखे बरेच रत्नागिरीकर आजन्म आंबे विकत खात आले आहेत.

काही बागायतदार कच्चे आंबे विकत. वडिल असे कच्चे आंबे शेकड्याच्या हिशोबाने विकत घेत. त्यात एक ‘बिटके हापूस’ हा प्रकार असे. ज्या देठांना काही आंबे एकदम लागतात, त्यातले काही आकाराने मोठे होतात, आणि काही छोटे रहातात. पण आकार छोटा असलातरी गुणधर्म सारखेच. आम्हाला या बिटक्यांचे भयंकर वेड. शिवाय हा छोटासा आंबा चवी इतकाच दिसयलाही ‘गोड’.

तर वडिलांचा ठरलेला विकणारा माणूस असे ‘बिटके हापूस’ सुद्धा विकायच्या. मग घरी आणून रितसर त्यांची अडी घालून वेताच्या करंड्यांमध्ये पिकायला ठेवत. दर दिवशी ती अडी बाजुला करून आंबे किती पिकले आहेत यावर नजर ठेवावी लागत असे. आणि एकदा का आंबे पिकायला लागले की संपूर्ण खोली हापूस आंब्याच्या वासाने घमघमत असे. पिकलेले आंबे जमिनीवर नीट पसरुन ठेवावे लागत. खोलीभर नुसते आंबेच आंबे. हवे तितके खा. काही बंधन नाही. हापूसच्या जोडीला पायरी, रायवळ आंबे ही मुबलक असायचे.

आई विविध आंब्याचे विविध प्रकार करायची. कैरीचे ताजे लोणचे, आमरस, साखरांबा, पन्हे, आंब्यची साटं, रायवळच्या पिकलेल्या अख्ख्या आंब्याचे रायते, पल्प, आंब्याची वडी, केक, आईस्क्रिम, जाम, आणि बरेच काही. दर दिवशी नविन बेत असे. ही चंगळ अगदी आंब्याचा सिझन संपेपर्यंत चाले.

सुट्टीत घर पाहुण्यांनी भरुन जायचे. मावस-मामे-आत्ये-चुलत भावंड एकत्र जमून आंब्याचा यथेच्छ आनंद घेत असू.

“मे महिना = आंबे” हे समीकरण आयुष्यभर जुळून आलेले… अगदी मागच्या वर्षापर्यंत. या वर्षी न्यूजर्सी मध्ये आहे. अजून आंबा खाल्ला नाही याची हुरहुर वाटत होती. माझ्या इतकेच माझ्या नवर्‍यालाही आंब्यांचे वेड, त्यात करुन ‘हापूस’ चे जरा जास्तच. शोधाशोध करुन इथे कोणीतरी ‘रत्नागिरी हापूस’ विकतात हे कळले आणि शनिवारी सकाळी लगेच तिकडे आंबे आणायला पळालो. $४८ ला १ डझन या दरात आंबे विकत घेतले. महाग मिळाले खरे… पण मिळाले ‘हे ही नसे थोडके!’ 🙂

काल पहिला आंबा पिकला. आधी देवाला ठेवला आणि मग आम्ही दोघांनी प्रत्येक फोडीचा आस्वाद घेत घेत,  तो फस्त करण्याचे स्वर्गीय सुख घेतले.

आता आपण एक डझनच आंबे का आणले? अजून आणायला हवे होते का? हे आंबे लगेच संपतील, मग पुढे काय? आताशा विकणार्‍याचे आंबे संपले असतील. अशा एक ना अनेक विचार मनाला भेडसावतात. काय करणार…? मोजून मापून आंबे खायची सवय नाहीए ना!!! 😀

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Advertisements

अंमलबजावणी

Information

7 responses

22 05 2011
Ravindra Kore

हापूस आवडला!
यंदा हापूस इतका महाग झालाय कि इथे भारतातही (अगदी रत्नागिरितही) सर्व सामन्यांच्या आवाक्या बाहेर गेलाय. त्यामुळे तुम्हाला इतक्या दूर राहूनही निदान एक डझन हापूस खायला मिळाला याचा आनंद झाला. आणि हो, आता आंबे मोजून मापून खायची सवय लावायला हवी, नाही का?

आपला वाचक,
रवींद्र कोरे

13 05 2011
Mangal Rane

Hapus awadla. Season sampe paryant tula bharpur ambe khayla milot hi devakade prarthana.

13 05 2011
prasad

Ruhide…..ithe sakal, dupar, sandhyakal faqt ani faqt ambe itkech kay te khat ahe….madhe ek divas thode angashi ale…mhanje pot bighadle…pun i dont attribute this to ambe…it may have happened due to shengdane…aso…
khupach chan….avadla tuzha hapus cha lekh….coincidentally, mazhya eka mitrane sarva chilla pillan sathi hapus che t-shirt kele ahet…te suddha me justat collect kelet….so its hapus everywhere….
we started as long as april 4…gudipadwyachya divhsi…jevha ithe 2000 rupaye dozen hote….hahahaha….but since then chaluch ahe….shur sakali uthla ki amba ase mhanun je chalu hoto to thambatach nahi….aso…hope u eat more at some reduced prices….and plan your next trip in may so that bharpur khaun jashil….

13 05 2011
हेरंब

जर्सीत कुठे मिळतात हापूस? पत्ता देऊ शकाल का? मी चार वर्षं जर्सीत राहून तळमळतोय हापूस खाण्यासाठी :).. प्लीज..

13 05 2011
सुदर्शन

wholefoods (Texas) madhe milat ahet asa aajach sakali aikalay….
Tithe te Indian mango mhanun vikat ahet. bhav post madhe sangitalya pramanech ahe.

http://www.wholefoodsmarket.com/

13 05 2011
Abhijit Kulkarni

Mastach.. hyavarun mala athavla… Mee NJ, Parlin madhye astana, eka patel chya dukana javal eka (pakistani) desi cha dukan hota.
tyachya kade kahi ambe hote vikayla ani mala yevun 3nch divas zale hote ithe. Tyala sahaj vicharla kuthla amba ahe re?
( to totapuri/ ani kuthlya tari jateetla mix / hybrid amba hota with worst taste ever)

Chatkaan mhanala.. alphanso.. 🙂 mee dole motthe kele.. kapalavar haat marla (manatlya manat) ani swatahala mhanalo… nasheeb ha amba ahe evdha tari thavuk ahe tula. ani neet baher gelo…

ani ho tyach divshee mee mazhya ayushyat pahilyanda Rs 60 la ( $1.25) ek mithacha kharat samosa khalla jo 3 divas sheela hota.. ha ha…

ashich gammat….

13 05 2011
meera

ruhi khup chan lihila ahes. agadi eka true konkani mansach manogat lihila ahes… wachtana dolyanpudhe chitra ch ubha rahat hota. karan saglya abroad madhe asnarya konkani mansachi hiich awastha ahe.. agadi amchi suddha…khup chan………. good work

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: