पावसाच्या पहिल्या सरीत…

25 05 2011

पावसाच्या पहिल्या सरीत…..
अंगणात जाऊन बागडायचं
मनातल्या भावनांना
ओलं चिंब भिजवायचं

तप्त धरा शांत करायला
पाऊस वाटे हवा हवा
अंग-अंग मोहरुन टाकी
हवेतला हा गारवा

पाण्यात भिजवून
मनं करायचे बेधुंद
अन् श्वासांमध्ये साठवून घ्यायचा
मातीचा सुगंध

पावसाच्या पहिल्या सरीत….
नक्की असंच करायचं
गाडी काढून, घाटामध्ये
धबधबे शोधत फिरायचं

अंगावर झेलायच्या
 कोसळणार्‍या धारा
कानांमध्ये घुमू द्यायचा
गार गार वारा

प्रत्येक सर नविन भासते
नवा तिचा स्पर्श
मनं-चक्षुत भरुन घ्यायचा
हिरवा गार निसर्ग

थेंबन् थेंब अनुभवायचा
सोडून सारी चिंता
हळू-हळू उलगडू द्यायचा
भावनांचा गुंता

पावसाच्या पहिल्या सरीत…..
नखं-शिखांत निथळायचं
पावसाबद्दलचे प्रेम
पुन्हा पावसालाच दाखवायचं

पावसाच्या पाण्यासारखं
अंगणभर पसरायचं
खळखळणारा निर्झर होऊन
नदीत जाऊन मिसळायचं

नाजूक हातात झेलू पाहायचे
टपोरे कांचबिंब
दवाच्या मोत्यांमध्ये शोधायचे
स्वत:चे प्रतिबिंब

पावसाच्या पहिल्या सरीत…..
त्याची आठवण काढायची
नविन सरीसोबत त्याला आणायची
पावसाला विनवणी करायची!

© Ruhi’s Creations 2011

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Advertisements

अंमलबजावणी

Information

2 responses

29 07 2011
suhaas

Class

25 05 2011
rohini gore

khup chhan aahe kavita! aavadali.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: