दिवाळी फराळ

26 10 2011

आईच्या हातचा दिवाळीचा फराळ म्हणजे ‘स्वर्गीय सुख’!!!!

हा फोटो २-३ वर्षांपूर्वीचा आहे. अजून ती चव जिभेवर रेंगाळते आणि पटकन निघून आईकडे जावे मनात येते.

यंदा उत्साहात  बेसानाचे लाडू करायचा घाट घातला. पहिल्यांदाच केले त्या मानाने छान झाले. १ तास बेसन भाजत होते तेव्हा जाणीव झाली की आपल्या आईला दिवाळीचा फराळ करताना कित्ती कष्ट पडत असतात. ते ही इतकी वर्ष, ती सगळे पदार्थ, कमी वेळेत आणि सुग्रण प्रकारे कसे काय करत आली आहे याचे राहून राहून आश्चर्य वाटते. घरी अमक्याला चकली आवडते, तमक्याला रवा लाडू, बेसन लाडू लागतो, लेकीला करंजी, शंकरपाळे, लेकाला चिवडा, अनारसे, जावयाला चिरोटे, शेव असे एक-एक करत ती सगळा फराळ करतेच.

आम्ही भावंडे तिला दिवाळी आधी ताकीद देतो की यंदा काही करु नको, हल्ली सगळे विकत मिळते, बाहेरुन आण. पण ती थोडीच शांत बसणार आहे? आम्हालाही आतून माहित असते की तिच्या हातचा पदार्थाची सर विकतच्या वस्तूला कुठे येणार?

घर सोडून नोकरी-शिक्षणाला बाहेर पडले आणि दिवाळीच्या फराळाच्या शिदोरीचे महत्व आणखी समजले. आई भरपूर डबे देत असे. ऑफिसमधे खाऊ नेला की सगळे तुटून पडत त्यावर. मग तो पुरवून पुरवून खात असू.

दिवाळीच्या सकाळी उटणे लावून अभंग स्नान, सहकुटुंब फराळ, एकत्र फटाके… काय मजा असते ना देशात. परदेशात काही feel येत नाही.

आज इतर कशापेक्षा आईचीच जास्त आठवण येतेय मला. Hope, पुढच्या दिवाळीला आई सोबत, भारतात असेन.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Advertisements

अंमलबजावणी

Information

One response

17 11 2011
purushottam

tinhi jagacha swmi aai vina bhikari ! aai manje gerat

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: