अ.चि.गो.- १.चौथी खोली

29 07 2015

अगदी चिमुकल्या गोष्टी अर्थात अ.चि.गो. हे नविन सदर सुरु करते आहे. नावात आले ना सगळे… काही अनुभव, काही किस्से, प्रसंग किंवा आठवणी त्याही मोजक्या शब्दात, मोजक्या वाक्यात मांडायचा हा एक प्रयत्न! 

तर ही पहिली चिमुकली गोष्ट – चौथी खोली

आम्ही भाडेकरू म्हणून रहात होतो त्या घराला तीन खोल्या होत्या – सलग, रेल्वेच्या डब्ब्या सारख्या. घराला स्लॅब होता. वर गच्ची. स्वयंपाकघराच्या मागे पडवीवजा खोली, तिला मात्र वर कौलं होती. खाली कोबा होता. साठवण, खीरीसाठी धुतलेले तांदूळ व भाजणी साठीचे सावलीतले वाळवण वाळत घालणे, वर काही (फक्त) पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठीच्या दोर्या, कोपर्यात पाटा-वरवंटा, स्टोव्ह, त्यावर आंघोळीचे पाणी तापविण्याचे तपेलं, इ. साठीची ही जागा. त्या खोलीला आम्ही ‘चौथी खोली’ म्हणायचो. तीन खोल्यांच्या पुढंची म्हणून चौथी. नंतर आम्ही स्वत:च्या प्रशस्त बंगल्यात रहायला गेलो. नविन घरात पण अाधी सारखीच अशी एक शेवटची खोली. त्या खोलीतून गच्चीवर जाण्याचा जिना, washing machine, तसेच आधीच्या घरातल्या ‘चौथी खोली’ मधील बरंच काही. या खोलीला देखील ‘चौथी खोली’ हेच नाव पडले. गंमत म्हणजे हे नविन घरच मुळी सहा खोल्यांचं होतं! आणि कशीही आकडेमोडी केली तरी ही खोली ‘चौथी’ येत नव्हती. पण या चौथ्या खोलीने मनात कायमचे घर केलं.

Advertisements

अंमलबजावणी

Information

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: