अ.चि.गो.- ३.विजोड

6 08 2015

१. पाव-भाजी केली असते. खाता-खाता भाजलेले पाव संपतात. तो पाव शेकायला उठतो. तवा गरम करून त्यावर पाव भाजतो आणि मग त्यावर लोणी लावायला घेतो. ती ओरडते,”मला पावाला आधी लोणी लावून मग शेकलेले पाव लागतात”. तो ही वचकून,”मग ते आधी सांगायचे ना!”. त्यांचा दहा वर्षांचा संसार. मग इतकंही ठाऊक नाही? एकमेकांच्या सवयी कळायला हा काळ पुरेसा नाही का?

२. ती खूप मनमिळावू, सोशिक, प्रेमळ. त्याने फक्त आणि फक्त पैशावरच प्रेम केलं. ती सगळ्यांचं आनंदाने करणारी. त्यामुळे त्याचं फावलं. आता दोघं दोन किनार्यांसारखं आयुष्य जगतात. तिची फरफट, तिचा संघर्ष चालूच आहे…एकटीचाच!

३. तो अल्प समाधानी. ती कायम असमाधानी. कितीही मिळालं तरी एक डोळा दुसर्यांजवळ अजून काय काय जादा आहे हे बघण्यात गुंतलेला. म्हणून नेहमी असंतोष!

४. तो अगदीच वेगळा – बुटका, हिप्पी सारखे केस, चित्र काढायचा, गिटार वाजवायचा, लिहायचा, लुख्खा वाटायचा. कोण्या मुली बरोबर होता. मग बिनसले काहीतरी. ती एका शास्त्रज्ञाची मुलगी. अंगकाठीने आडदांड, कायम just awake look, वशील्याचा तट्टू वाटायची. यांची ओळख झाली आणि लग्नाची बातमीही आली. एकदम अशक्य वाटले. संसार नाही म्हणायला ‘बहरला’ देखील. मग एकमेकांचे फोटोही होते काही वर्ष फेसबुकवर. आता सगळेच शांत. साधा उल्लेखही नाही!

काही जोड्या विजोड वाटतात हेच खरं!

~~~~~~~~~~~~~~~~

इतर अगदी चिमुकल्या गोष्टी :-

१. चौथी खोली

२. राग

Advertisements

अंमलबजावणी

Information

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s




%d bloggers like this: