‘ती’ – १३

8 09 2015

‘निळकंठेश्वर’ला जाण्यासाठी अलीकडच्या ‘रूळे’ गावात गाडी लावून, होडीने नदी पार करून मग डोंगर चढलो. परतून पायथ्याशी असलेल्या वाडीत आलो तेव्हा दुपारची रणरणती उन्हं ओसरायला नुकतीच सुरूवात झाली होती. होडी येईपर्यंत नदीत मनसोक्त डुंबणार्या म्हशी व हिरवीगार शेतं बघण्यात छान वेळ घालवला. नदी ओलांडून रूळे गावात आलो. गाडी काढली आणि जरा रस्त्याला लागलो इतक्यात एका म्हातारीने गाडीला हात दाखविला. ‘ती’ बसथांब्यावर बसची वाट पाहत उभी होती. मी गाडी थांबविल्यावर लगबगीने तिने आत शिरत विचारले, “मला राजाराम पुलापाशी सोडाल?”. मला दया आली. आणि तशीची गाडी मागे पूर्ण रिकामी होती. माझ्या मैत्रिणीने जराशा नाखुषीने तिला सांगितले, “हो पण तो डबा आधी सीट वरून खाली पाया जवळ ठेवा.” माझ्या मैत्रिणीचा मी अशी कोणालाही लिफ्ट देण्याला विरोध होता. कोण कसे असेल सांगता येत नाही हल्ली. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते खरंही पण ही ‘ती’ तशी नसेल असा मनात पक्का विचार झाला व मी तिला गाडीत घेतले.

ही ‘ती’ साठी ओलांडलेली आजीबाई, पिकलेले केस, नऊवारी नेसलेली, डोक्यावर पदर, चेहरा वार्धक्यामुळे सुरकुतलेला, सोबत एक मोठ्ठा गोलाकार ऐलुमिनियमचा डब्बा, त्यात कांडपाचे काहीतरी होते, वयाच्या मानाने बरीच चुणचुणीत, ठणठणीत होती. शरीर शेतात कष्ट करुन कणखर झालेले. पूर्वीचे पोसलेले पिंड ते – आपल्यासारखे पेचू नाहीतच!

मी बोलते केल्यावर ती ही गप्पा मारू लागली. ती इथल्याच गावातली, शेतकरीण होती. स्वत:ची काही एकर जमीन होती. ती सांगत होती,”तुमच्या एवढे नातू हायत पन कुनालाबी शेती करायची नायं. कालीजात जातात. सिकन्यास ना नाय पन शेतीची जमीन बिल्डराला विकू या म्हनून बापाच्या मागे हायत. सालाला ३-४ पिकं पिकत्यात गहू, मीरची, अशी. खाऊन-पिऊन सुखी हावत. थोडं पैकंही उरत्यात. बरंच हाय समदं. आता नातवंड जमीन विकाया मागं हायत. बिल्डराने दिलेला पैका किती साल पुरनार? शेतीचा पैका कमी हाय पन हर साली मिलतुया. नातूंना लय पैका हवा जगाया. पन एकदा जमीन गेली की गेली…कसं काय करनार? समदे शहराकडं गेले तरी अन्न कोन पिकवनार?”. बिल्डर कवडी मोलाने शेतकर्यांकडून जमीन विकत घेऊन तिथे डोंगरात बंगले बांधून विकणार होता. तिला मनाला हे फारच बोचत होते. मला या वर काय बोलावे कळेना. आम्ही गप्प ऐकून घेत होतो.

दोन्ही बाजू आपापल्या जागी बरोबर होत्या. म्हणजे जमीन विकण्याची नव्हे पण आजच्या काळात पैसाही हवा. नुसते खाऊन-पिऊन सुखी यात भागणार नव्हते. नातू तरूण होते, प्रलोभनं होती. पण म्हातारी या वयातही व्यवहारज्ञानी होती. हातची जमीन कायमची गेली की मग काहीच उरणार नाही हे तिला ठाऊक होते. ती ईष्ट ठिकाणी उतरून गेली तरी तिचा,”बिल्डराने दिलेला पैका किती साल पुरनार?” हा सवाल मनातून उतरुन जाईना!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s
%d bloggers like this: