‘ती’ – ५

9 02 2012

तिचे लग्न तिच्या घरच्यांनी ठरविले. हा.. हा.. म्हणता पसंती झाली आणि थोड्याच दिवसात साखरपुडाही पार पडला. दरम्यान तिची तिच्याच एका सहकर्‍याशी मैत्री झाली. तो वयाने तिच्याहून लहान, पर धर्माचा. त्याचेही लग्न ठरलेले. दोघेही एकमेकांशी खूप बोलंत, गप्पा रंगत. दोघेही गुंतत गेले एकमेकात, अगदी नकळत! एक पायात लग्नची बेडी अडकत होती आणि दुसरा पाय स्वच्छंदी होऊन उड्या मारायची स्वप्न पाहू लागला. तिला कळेच ना की हे नक्की काय होतंय? दोघे फक्त कामाच्या ठिकाणी भेटत होते तेवढेच… पण मनं अडकत होती. दोघांनाही एकमेकांचे लग्न ठरल्याचे माहीत होतेच… पण हे नातेही हवेहवेसे वाटत होते.

तिला होणार्‍या नवर्‍याचा फोन यायचा बोलायला, ती बोलायची देखील… तरी कुठेतरी उपरेपणा वाटायचा. आणि खरं म्हणजे – ती नवर्‍यापेक्षा ‘त्याच्या’ फोनची जास्त वाट बघायची. तिने एकदा विचार केला घरी सांगावे का – तिचे वडिल, काका, भाऊ तसे स्वभावाने तापटच. त्यात तो मुलगा वेगळ्या धर्माचा – हे सगळे कळले तर ते काय करतील देवालाच ठाऊक. तशी ती स्वभावाने आधीपासूनच अतिशय घाबरट. ‘त्याच्या’तही समाजाच्या भिंती तोडून तिला आपले करण्याचे बळ नव्हतेच. दोघांनी आपाआपले मार्ग निवडले. तिचे मोठे थाटात लग्न झाले.

ते नाते प्रांजळ होते, मनाचे-मनाने-मनासाठीचे नाते… त्याक्षणीतरी वासना-विरहीत असे स्वच्छ सुंदर मैत्रीचे नाते…एकमेकांना संबोधताना ‘सर’ आणि ‘मॅडम’ म्हणण्या इतकी औपचारिकता असुन देखील सहहृदयी असे नाते…

तिच्यासमोर अस एक नाते होते जे कदाचित त्याहून काही जास्त होऊ शकले असते. आणि लग्ना नंतर एक नाते होते जे मनाआधी तिच्या तनावर राज्य करु पाहत होते. (नाही, तसा तिचा नवरा काही वाईट नव्हता/नाहिए) पण हिला जड गेले ते सारे विसरणे, दुसरे आपलेसे करणे, सगळेच!

लग्नानंतर ती मला भेटली आणि तिने मनाला वाट मोकळी करुन दिली. मी ऐकून थक्क! ‘ती’च्या कडून असे काही ऐकायला मिळेल असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. ती शांतपणे सांगत होती, मी मनाचे कान करुन तिचे बोलणे ऐकत होते. तिचे बोलून झाल्यावर मी तिला विचारले – “बोलता का अजूनसुद्धा?” ती उत्तरली “नाही”. मग मी वेगळे विषय काढून तिला रिल्याक्स केले. सगळे विसरुन यातून बाहेर पड असे सांगत मी तिचा हात हातात घेतला. पण नुसते सांगणे आणि ते करणे याच्यातला फरक कळत होता माझा मलाच.

तिने मलाच हे सगळे का सांगितले असावे हा विचार मी पुढचे बरेच दिवस करत राहिले. खरंतर माझ्याहून बर्‍याच अजून जवळच्या मैत्रीणी आहेत तिला. कदाचित मी समजून घेईन असे तिला वाटले असावे… की तिला कोण्या जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त व्हायचे होते… कन्फेस करायचे होते… देव जाणो!

तिच्या वाढदिवसाला नेमका तिचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी जाणार होता म्हणून ही माहेरी गेली. आणि तिचा मला फोन आला. ती सांगत होती “रुही, मी माहेरी आलेय हे ‘त्याला’ कळले आणि त्याने एकदाच भेट अशी मागणी केली…ती देखील माझ्या वाढदिवसा दिवशी”. मी काही पुढे विचारायच्या आधीच ती बोलत राहिली – “मी भेटले त्याला! अगदी शेवटचे…पुढे कधीही न भेटण्याचे ठरविले आम्ही दोघांनी…”. 

तिच्या वाढदिवसाला तिने अशी विचित्र भेट दिली… स्वत:लाच!!!

*************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

2 responses

9 02 2012
Purnima

ekda wachayla surwaat keli ani wel kassa gela te kalalech nahin…manala waacha futlya sarkhe…wachat rahave aase watat hote….khupch chaan…lihat raha…

9 02 2012
anupriya dikshit

bedi smajachi ashich…………

यावर आपले मत नोंदवा