‘ती’ – १

16 11 2011

स्त्रीच्या विविध रूपाने मी अगदी भारावून जात आलेय. ‘ती’ कोणी एक स्त्री नाही. तिच्या अनेक प्रतिमा, अनेक चेहरे, अनेक छबी. आज वर आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ‘ती’ निरनिराळ्या स्वरूपात भेटत आली. आणि त्या-त्या वेळी तिने ह्रुदयाला स्पर्श केला.

कधी मैत्रिण म्हणून, कधी कामवाली बाई म्हणून तर कधी अजून कोणी. कधी मला ‘ती’ ची दया आली, कधी आवडली, कधी भावली, कधी रागही आला असेल तिचा, पण कुठेतारी ‘ती’ मनात रुजली. आणि आज म्हणूनच प्रत्येक ‘ती’ च्या विषयी लिहावे वाटले. म्हणून ही श्रुंखला…

‘ती’ च्याशी माझा असलेला संबंध/नाते मी स्पष्ट करेन किंवा करणारही नाही. खरे नाव सांगेन, किंवा कालपनीक नावंही देईन. ती चांगली की वाईट, चूक की बरोबर या खोलात मला शिरायचे नाही. मला तो अधिकारंही नाही. मला तसे करुन तिला दुखवायचे तर मुळीच नाही. ती ही अशी एक व्यक्ति/स्त्री शक्ती आणि ‘ती’ माझ्या मनात का आणि कशी रुजली एवढेच सांगण्याचा एक छोटासा प्रयास – तुमच्यापेक्षा माझ्या स्वत:साठीच कदाचित!

****************************
‘ती’ – १

कधी, केव्हा, कशी ते नक्की आठवत नाही पण बेगम मासे विकायला घरी येऊ लागली. बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे बहुदा मांसाहाराचे दिवस धरले जातात. बेगमच्या कोण्या नातेवाईकाच्या मासेमारीच्या लॉंच बोट होत्या. मध्यरात्री मासेमारी करुन पहाटे मासे आले की बेगम ते घेऊन विकायला निघायची. ६:३०-७:०० च्या दरम्याने घराच्या फाटकापाशी येऊन हाक मारायची. ती ताजे-ताजे मासे घेऊन आलेली असायची. मासे हवे असल्यास आई तिला ‘थांब, आले’ एवढेच ओरडून सांगायची. महिन्याचा हिशोब एकदम महिना अखेरी होत असे. तिची ठरलेली घरं असायची, त्यांच्याकडेच ती मासे विकायला जायची. दारो-दारी ओरडून तिने कधीच मासे विकले नाहीत.

नावावरुन समजलेच असेल ‘बेगम’ मुस्लिम आहे. पंनाशीच्या आत-बाहेर वय, जरासा उभट सस्मित चेहरा, गव्हाळ वर्ण, सुळसुळीत पाचवारी साडी, डोक्यावरुन पदर, मोठा अलुमिनियमचा मासे-बर्फाने भरलेला डबा डोक्यावर. बेगम विधवा होती. लग्नानंतर लगेच तिचा नवरा कोणत्यातरी आजाराने गेला. ही आई कडे परतली. माहेरी भाऊ-भावजया, आई आणि ही. आईकडे हीच लक्ष देत होती. मासे विकुन तिचा आणि आईचा खर्च भागवत होती, आईला तरीही मुलंचा पुळका होताच. एका भावाला हिने शब्द टाकून, पैसे भरुन कुवैत ला का कुठेतरी नोकरी लावली होती. हिची जबाबदारी ही स्वत:च घेत होती.

माझ्या आईशी बेगमचे छान संबंध जुळत होते. आई तिला चहा-नाश्ता केल्याशिवाय जाऊ देत नसे. कुठे दिवाळीचा फराळ, कैरीचे लोणचे, फणस, ती हक्काने मागून नेत असे. व्यवहार फक्त नावाला उरला. माझ्या आईने देखील कधी तिच्याशी घासा-घीस केली नाही. २ पैसे जास्त गेले तरी तिने आणलेला माल चोख होता.
 
माझ्या वडिलांचे किडणी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यावेळी बराच खर्च झाला होता. शिवाय त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांचा धंदाही मंदावला होता. हॉस्पिटल मधे बेगम त्यांना बघायला आली आणि कोणी न सांगता, काही न बोलता आईच्या हातात ३००० रु. देत म्हणाली “ताई, आधी हे घ्या.. असू देत जवळ” त्या मदतीचे मोल करणे अशक्य!

बेगमच्या घरच्यांनी तिचे एका विदुराशी लग्न करून दिले. त्या माणसाला लहान-लहान तीन मुले होती – एक मुलगी, २ मुलगे. तिचा नवर्‍याचा पण मासेमारीचा व्यवसाय होता राजापुरजवळ एका छोट्या गावी. लग्ननंतर ती तिच्या नवरा व मुलांबरोबर आली होती. रंगपंचमीचा दिवस होता तो. आईने छान पदार्थ केले, तिला आहेर केला. दुसर्‍या गावी गेल्यामुळे बेगमचे नेहमीचे येणे कमी झाले. आठवड्यातून एकदा ती येत असे मासे घेऊन. चहा घेत-घेत गप्पा होत. खुशाली कळे. मुलांना हिने जीव लावला होता. मुलं मोठी होत होती. तिघांमधे एकच मुलगा हुशार होता, त्याला तिने हॉस्टेलवर ठेवले होते. बाकी दोघांना अभ्यासात गती नव्हती. मुलीला शिंग फुटली आणि ती घरातून कोणा बरोबरतरी पळून गेली. ती भानगड सोडवते नाही तोवर तिचा नवरा एका बाईच्या नादी लागला. आगीतून-फुफाट्यात पडावे अशी बिचरीची गत झाली. हिने शिकवलेला मुलगा बापाच्या बाजुने झाला आणि ज्याला ही बिनकामाचा समजत होती तोच हिचा आधर बनला. आधी पंचायत मग कोर्ट-कचेरी असे सुरु आहे बिचरीचे. आता वेगळी खोली घेऊन राहतात माय-लेक. ही मासे विकते, मुलगा बोटीवर काम करतो आणि गुजारा करतात. येणार्‍या परिस्थितीला तोंड देत ती लढतेय आयुष्याशी.

माझा परदेशी असलेला मामा किंवा कोणी पाहुणे येणार असे कळले की बेगम हवे तसे मासे आणून देत असे. माझी बहिण सुद्धा मासे-प्रेमी, ती किंवा तिचा नवरा कोल्हापूरहून येणार आहे असे कधीतरी आई अंधुक बोललेली असायची बेगमला आणि कधी स्वत:ला नाहीच जमले  यायला तर ती माझ्या बहिणीसाठी कोणा ना कोणा बरोबर मासे पाठवून देत असे. मी मासे खात नाही यावर ती विलक्षण नाराज असते. आणि माझा नवरा जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा घरी रत्नागिरीला आला तेव्हा ती प्रेमाने त्याच्यासाठी मासे घेऊन आली होती. तेव्हा तिच्या डोळ्यात समाधान होते.
 
माझ्या आईची आणि तिची आत्ताशा खूप घट्ट मैत्री आहे. आई तिला काही ना काही मदतही करत असते. माझे वडिल मासेखाऊ होते. माश्याचे जेवण असले की ते मनसोक्त जेवत. कालांतराने वडिलही गेले. मासे घेण्याचे प्रमाण कमी झाले. बेगमला एव्हाना घरी येण्यासाठी कारण लागत नाही. ती येते, आईला भेटते. “जास्त दग-दग करु नको” असे दोघीही एकमेकींना सांगतात. प्रेमाने माझी, माझ्या बहिणीची, जावयांची चौकशी होते. भावासाठी एखादे पापलेट आणलेले असते…

गेली २० वर्ष, प्रत्येक सुख-दु:खात बेगम आमच्यासाठी आणि माझी आई तिच्यासाठी होती. अगदी मागच्याच महिन्याची गोष्ट – माझ्या वडिलांचे श्राद्ध होते. आईने वाडी दाखवली आणि जेवायला बसणार इतक्यात ही दारत हजर. आईने पोटभर जेऊन पाठवले. ते बघून वर माझ्या वडिलांनाही समाधान वाटले असणार. माहीत नाही ही अशी कोणती नाती असतात जी वेळ, काळ, जात-धर्म सगळ्यांच्या पलिकडची असतात. ही कोण कुठची बेगम, काय निमित्त? तर ती मासे विकणारी,  पण ती आमच्या घरचीच होऊन गेली.
 
मी येणार आहे हे कळले की बेगम मुद्दाम भेटायला येते. गप्पा होतात. प्रेमाने चौकशी होते. तिची कहानी मी ऐकून घेते. जमेल तसे तिचे सांतवन करते. बाकी काही हातात उरत नाही. तिच्या आणि माझ्याही…

*************
‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

12 responses

3 06 2012
Deepak.

SPEECHLESS….. go on,best wishes.

9 02 2012
sangeeta

khupch sunder lihile ahe,Apratimmmmm

7 02 2012
Dev

अप्रतिम! बेगम डोळ्यासमोर उभी राहिली.. Very touching!

18 01 2012
rashmi

khupach chaan.

18 01 2012
rashmi

too good.begam ubhi rahili dolyasamor.khupach chaan.

30 11 2011
सुदर्शन

Good one

21 11 2011
Nayana

Ruhi, khup chhan vatale vachun. Ratnagiriche ghar, aai ani hi situation dolyasamor ubhi rahili.. awadale khup …

17 11 2011
Kishori

Too good!! Simple and short. Loved it. I am a big fan of your write-ups Ruhi 🙂 This one made me cry though (I don’t know why) anyway lets not get into that 😉 The point is you write straight from the heart which makes a great difference 🙂
Keep it up. Looking forward to the next one 🙂
Love,
Kishori

17 11 2011
Meena

Ruhi,
this is so beautifully written.
Just felt like i am reading a short story book.
You really write like as if the things are happening in front of you.
its true to heart 🙂
You should start writing a novel.
I think you must have already :).
You really have so much talent photography literature writing and much more.
Do something about it 🙂
keep it up. All the best
Regards
Meena

16 11 2011
Kalyani

Hi Ruhi,
ur blog is very nice…chan lihale aahe tu.Me tuzhe aadhi che blog vachale hote…ha pan blog tevdhach changala aahe…If i m not wrong …you always write it from ur heart… :))
And I also liked the friendship and concern between ur mom and Begam….
Keep writing… 🙂

Kalyani

16 11 2011
Arati K

Apratimmmmm…..
what can i say ,its such a beautiful virtual journey to almost similar childhood days.
Aamchya kadhe havabi navachi masewali yaychi …for ages i remember …and she used to give me a small kurli …
tya kurlichya payala dora bandhun aamhi tila kutryala firavto tasa firvaycho…

16 11 2011
prasad

अप्रतिम रुही….बेगमला बेमालूम पणे डोळ्या समोर उभे केलेस….
मला नक्की वाटू राहिलंय कि एखाद दिवस तू तुझ्या छोट्या गोष्टींचे पुस्तक जरूर काढशील….आणि ते खूप लोकप्रिय होईल…
My best wishes and keep writing. It’s inspiring 🙂 and a treat from you

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s
%d bloggers like this: