‘ती’ – १०

26 09 2014

खूप वर्षांनंतर मागच्या वर्षी आम्ही फोनवर बोलत होतो. त्या मी अमेरीकेत आल्या पासून ‘फोन कर’ मागे लागल्या होत्या पण राहून जात होते. शेवटी नििमत्त िमळाले आणि मी त्यांचा नंबर फिरवला. त्यांच्या मुलीला दोन मुलींनंतर मुलगा झाला होता. आणि माझी due date जवळ आली होती. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या “रुही, तू कसलेच टेन्शन घेऊ नकोस. देवबाप्पा तुझे सगळे नीटच करेल.” खरंतर त्या ख्रिस्चन पण ‘देवबाप्पा’ हा त्यांचा पेटंट शब्द! मला त्यांचे ते बोलणे सवयीचे असले तरी तेव्हा आधाराचे वाटले, थोडे हसूही आले.

त्या आमच्या ‘निलू आंटी’. माझ्या पुण्यातल्या काही वर्षांच्या शेजारी होत्या. मी ती जागा सोडली आणि त्या ही मुलीकडे अमेरीकेत आल्या. मग संबंध तुटला.

त्यांचे वय असेल ५०-५५ च्यावर. त्या अनाथाश्रम वाढल्या. मोठ्या झाल्यावर मिशनरी आश्रमामधे दाखल झाल्या. शिवणकाम, विणकाम, भरतकाम असे बरेच काही िशकल्या. लग्न झाले आणि सुगीचे दिवस िदसले. मुंबईत आल्या. नवरा चांगला प्रेमळ होता. दोन मुलं झाली. नवर्याला दुबईत नोकरी िमळाली ड्रायवरची. मुलांना घेऊन त्या मुंबईतच राहिल्या. बरे चालले असतानाच नवरा अपघातात मरण पावला आणि होत्याचे नव्हते झाले. सगळेच एकटीवर आले. पण त्या दुःखातून सावरल्या. तशा त्या होत्याच हिंमतीच्या! कष्ट करायची सवय लहानपणापासूनच अंगवळणी पडलेली होती. हिंमतीला कष्टाची आणि आत्मविश्वासाची जोड लाभली की सगळ्या संकटांवर मात करण्याची ताकद येते. शिवणकाम करुन चार पैसे कमवून परिस्थितीशी झुंज केली. त्यांच्याच सारख्या मिशनरी होममधल्या त्यांच्या ‘बहिणी’ मदतीला धावून आल्या. मुलीने नर्सींगचे शिक्षण पूर्ण केले. बहुदा एखाद्या मिशनरी हाॅस्पिटल मधे पटकन नोकरी िमळावी या आशेने असेल. त्यातच अमेरीकेत नर्सींगला फार डिमांड असल्याचे कळले. त्यासाठी कोणत्या आणि कशा परिक्षा द्याव्या लागतील याचे कोणीतरी मार्गदशन केले. आणि मुलगी अमेरीकेत येऊन नोकरीला लागली देखील.

ती स्थिरस्तावर झाल्यावर तिने आईचे कष्ट थांबविले. पुण्यात ३ बेडरुमचा फ्लॅट घेतला आिण त्यांच्या ‘देवबाप्पा’ ने पुन्हा त्यांची ओंजळ सुखाने भरुन टाकली. मुलीचे खूप कौतुक होते. सगळे पुन्हा सुरळीत चालू झाले. मुलगी दर महिन्याला पैसे पाठवत होती. तिने तिचे लग्न ठरविले. ह्या आम्हाला पत्रिका देत सांगत होत्या, “वैशुने लग्न ठरवलंय. माझ्या एका ‘बहिणी’ च्या माहितीतलाच मुलगा आहे. तिकडेच असतो. चांगली नोकरी आहे. दोघं भेटली आणि प्रेमात पडली. देवबाप्पा त्यांना खूप सुखी करो हीच प्रार्थना आहे.” भारतात येऊन मोठ्या थाटात लग्न पार पाडले. आंटी खूपच आनंदीत होत्या. का नसाव्यात? मुलीने खरचं आईचे पांग फेडले होते.

हवे ते मिळत गेल्यामुळे त्यांचा मुलगा जरासा आळशी बनला. त्यांनी मुळीच त्याची गय केली नाही. त्याने काॅमप्युटरचे पुढे कोणते शिक्षण घेतले तर फायदा होईल?, त्याला किती स्कोप आहे? असे अनेक प्रश्न त्या आम्हाला िवचारत. त्यांना internet वापरायला, ई-मेल करायला मी शिकविल्यावर त्या मुलीशी छान संपर्क करु लागल्या. नविन काही ना काहीतरी शिकण्यात त्यांना भारी रस.

“रुही, बाबूने तू सुचविलेले computers masters चे शिक्षण पूर्ण केले. जावयाने त्याच्याच कंपनीतल्या पुण्याच्या ब्रान्च मधे नोकरीसाठी शब्द टाकला. सेटल झाला तो. जबाबदारीने वागतो. लग्न आहे पुढच्या वर्षी. तेव्हा जाईन भारतात.” त्यांच्या बोलण्याने मी भानावर आले. मुलीच्या बाळंतपणासाठी त्या अमेरीकेत आल्या. इथेच स्थिरावल्या. नातवंडांमधे रमल्या. मुलीलाही तेवढाच आधार व मदत.

“इकडे कोणाचीतरी मदत हवी बाळंतपणात. वैशूला मी आहे. पण मी आले तेव्हा काहीच मािहत नव्हते. सगळं शिकले. आता इंग्लिश बोलते. कार चालवायला पण शिकलेय. मागच्या महिन्यात ड्रायविंग टेस्ट िदली पण फेल झाले. पुन्हा देणार आहे. काहीतरी काम पण करायची ईच्छा आहे – बेबी सीटींग वगैरे. मुली-जावयाला कशाला आपला त्रास, नाही? इथे सगळे कसे independent असतात ना? देवबाप्पाने जो पर्यंत हात-पाय धड ठेवलेत तोवर करत राहायचे काही ना काही.” उत्साहाने त्या बोलत राहिल्या…

त्यांच्या त्या उत्साहामागील आत्मविश्वास वाखानण्याजोगा होता!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s
%d bloggers like this: